भाजपच्या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा आहे का?- सेना

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशावर भाष्य करताना शिवसेनेने 'सामना'तील अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. 'भाजपच्या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे, तेवढी त्यात हवा आहे का?', असा प्रश्‍न अग्रलेखात उपस्थित केला आहे.

अग्रलेखात म्हटले आहे की, "जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत प्रस्थापितांना दणका बसला, भाजपची संख्यात्मक वाढ झाली हे खरेच. मात्र या यशाचा फुगा जेवढा फुगवला जात आहे तेवढी हवा त्यात आहे का, हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. भाजपचा "टक्का' वाढला हे जरी खरे असले तरी "टोणपे'ही बऱ्यापैकी बसले आहेत. राजकारण आणि सत्ताकारण यात लपवाछपवी हा नेहमीचा खेळ असल्याने वाढलेले "टक्के' सांगितले जातात आणि बसलेले "टोणपे' लपवले जातात इतकेच.'

"भाजपचे यशात त्यांचा स्वत:चा वाटा किती आणि "मिसळलेला' वाटा किती यावरूनही त्या विजयाचा रंग कोणता, हे जनता ठरवीत असते', असेही अग्रलेखात म्हटले आहे. अग्रलेखात राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे विश्‍लेषण करण्यात आले आहे. लातूरसारख्या ठिकाणी भाजपने यश मिळविले असले तरीही सात जिल्ह्यात अधांतरी परिस्थिती असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे.

Web Title: Is it read success of BJP? - Shivsena