"आयटी'तील महिलांच्या सुरक्षेसाठी समिती 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी महिला आमदार आणि महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या समितीची घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी जाहीर केली. तसेच राज्यात एक हजार नागरिकांमागे एक पोलिस कर्मचारी व स्वयंसेवक उपलब्ध करून "झीरो टॉलरन्स टू ऑल टाइप्स ऑफ व्हॉयलन्स अगेन्स्ट वुमेन' असा प्रकल्प हाती घेऊन पोलिसांची संवेदनशीलता वाढविली जाणार असल्याची माहिती केसरकर यांनी दिली. 

माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांची संख्या वाढत आहे, या कंपन्यांमध्ये अनेक महिला काम करतात. मात्र, गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना पाहता, या महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्न शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडला. याला उत्तर देताना केसरकर यांनी याबाबत उपाययोजना करण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल, असे आश्वासन दिले. या समितीत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या प्रत्येकी दोन महिला सदस्य आणि तीन महिला पोलिस अधिकारी असतील. ही समिती एका महिन्याच्या आत आपला अहवाल देईल. त्यानंतर या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केली जाईल, असे केसरकर यांनी सांगितले. महिला पोलिसांची संख्या वाढवण्यासोबतच महिलांना दिवसभर बसवून न ठेवता त्यांच्या तक्रारी तातडीने नोंदवून घ्याव्यात, असे निर्देश पोलिसांना देण्यात येतील, असे गृह राज्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: IT women's safety committee