इटालियन महिलेकडून साईबाबांना सोनेरी मुकुट

पीटीआय
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

शिर्डी- एका बहात्तर वर्षीय इटालियन महिलेने साईबाबांना 72 लाख रुपयांचा सोनेरी मुकूट दिला आहे, असे श्री साईबाबा संस्थान ट्रस्टींनी सांगितले.

'सेलिनी डोलोरस ऊर्फ साई दुर्गा असे त्या महिलेचे नाव असून, साईबाबांच्या त्या कट्टर भक्त आहेत. गुरुवारी (ता. 9) त्यांनी 855 ग्रॅम वजनाचा सोनेरी मुकुट विश्वस्तांकडे सुपूर्त केला आहे,' अशी माहिती ट्रस्टचे सचिन तांबे यांनी दिली.

'सेलिनी या गेल्या नऊ वर्षांपासून प्रत्येक महिन्याला शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेतात. यापुर्वीही त्यांनी रुद्राक्ष व सोन्याचे दागिने असे मिळून 25 लाख रुपयाचे दान केले आहे. इटलीमध्ये त्या साईबाबांचे मंदिर उभारणार आहेत,' असेही तांबे यांनी सांगितले.

Web Title: Italian woman donates Rs 28 lakh gold crown to Saibaba

टॅग्स