आयटीआयच्या जागा वाढणार

ITI-Seat
ITI-Seat

सोलापूर - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडे (आयटीआय) मुला-मुलींचा कल वाढला आहे. मात्र, प्रवेश क्षमतेपेक्षा तिप्पट अर्ज आल्याने दरवर्षी दोन लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. या पार्श्‍वभूमीवर आता आयटीआयची प्रवेश क्षमता २७ हजारांनी वाढणार असल्याची माहिती कौशल्य विकास व उद्योजकता विभागातील सूत्रांनी दिली.

स्वयंरोजगार अथवा चांगल्या कंपनीत मुलगा कामाला लागावा, अशी अपेक्षा पालकांना असते. प्रात्यक्षिकावर सर्वाधिक भर अन्‌ नोकरीची खात्री, कॅम्पस निवडीद्वारे चांगल्या कंपन्यांत काम करण्याची संधी, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल आयटीआयकडे वाढल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र, प्रवेश क्षमता मर्यादित असल्याने अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर जादा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, या उद्देशाने प्रवेश क्षमता वाढविण्यात येणार आहे. याचबरोबर सुमारे ७० खासगी आयटीआय महाविद्यालयांना सरकारने नव्याने मान्यता दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com