मराठा जात मिळाली नाही, हेच माझे दुर्दैव : अनिल गोटे

Its unfortunate that I am not a Maratha says BJP MLA Anil Gote
Its unfortunate that I am not a Maratha says BJP MLA Anil Gote

मुंबई : ''पक्ष नेतृत्वाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. माझ्या कोणत्याही कामांना विरोध करणाऱ्याला पक्षाचे पदाधिकारी आणि मंत्रिगणच आर्थिक व शासकीय पातळीवरील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करुन पहिल्या दिवसापासून मदत करीत होते. यांसारख्या कारणांमुळे मी आता निर्णय केला आहे, की सोमवार (ता.19) रोजी विधीमंडळाच्या पहिल्या दिवशी मा. अध्यक्षांना भेटून विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर करणार आहे'', असे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच मराठा जात मिळाली नाही, हेच माझे दुर्दैव, असेही ते म्हणाले.
 
अनिल गोटे 2009 पासून आजपर्यंत धुळ्यातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी आता राजीनामा देण्याचे ठरवले आहे. याबाबतचे त्यांनी पत्रक विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना लिहिले आहे. या पत्रकात त्यांनी पक्षाचे नेते आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, डॉ. सुभाष भामरे हे मोदी साहेबांच्या कृपेने निवडून आले. खासदारपदी निवडून आल्यानंतर त्यांनी माझ्याविरोधात पक्षांतर्गत गटबाजी सुरु केली. पक्षातील कार्यक्रमात भामरेंनी माझा फोटो लावणेही बंद केले होते. मात्र, मी त्यांच्या नावासह फोटो बॅनरवर लावले होते. भामरेंसारख्या सर्वपक्षीय पराभूत उमेदवारास फक्त मराठा आहे, म्हणून अपघाताने मिळालेल्या जातीवर धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली. मात्र, मी जन्माने ओबीसी धनगर आहे. हाच माझा दोष असावा. 

दरम्यान, मला जन्माने राज्यकर्त्यांची मराठा जात मिळाली नाही, हेच माझे दुर्दैव. त्यामुळे मी आता निर्णय केला आहे, की सोमवार (ता.19) रोजी विधीमंडळाच्या पहिल्या दिवशी मा. अध्यक्षांना भेटून विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर करणार आहे, असेही गोटे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com