बळिराजाच्या लेकींचा पुणतांब्यात अन्नत्याग

Agitation
Agitation

पुणतांबे, (जि. नगर) - शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किसान क्रांती आंदोलनाचा भाग म्हणून सध्या राज्यभर ‘जागर किसान क्रांतीचा’ ही यात्रा सुरू आहे. आता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी कुटुंबांतील युवतीही सरसावल्या आहेत. उद्यापासून (सोमवार) या युवती अन्नत्याग आंदोलन सुरू करणार असून, त्याची ज्योत आज पेटविण्यात आली.

शेतकरी पित्यास ताकद देण्यासाठी परिसरातील युवतींनी ‘अन्नत्याग’ आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. येथील स्टेशन रस्त्यावर हे आंदोलन सोमवारी सुरू होईल. तत्पूर्वी आज या युवतींनी या आंदोलनाची ज्योत पेटविली. निकिता जाधव यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील युवती उद्यापासून अन्नत्याग करणार आहेत.

या आंदोलनाबाबत बोलताना जाधव म्हणाल्या, ‘‘शेतकरी संपाच्या वेळी सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. कर्जमाफी, दुधाला भाव, शेतीमालाला हमीभाव, असे अनेक प्रश्‍न आजही प्रलंबित आहेत. सरकारने या प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे म्हणून मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर किसान क्रांती आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली. राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये हक्कांविषयी व मागण्यांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी सध्या जागृती यात्रा सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता आम्ही महिलाही एकत्र येणार आहोत. त्याचा पहिला टप्पा म्हणून उद्यापासून अन्नत्याग करण्यात येणार आहे. आज ज्योत पेटवून या आंदोलनास सुरवात झाली. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने पाहावे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com