Jagdeep Dhankar Governer of West Bengal is interested in political scenario in Maharashtra
Jagdeep Dhankar Governer of West Bengal is interested in political scenario in Maharashtra

महाराष्ट्रात काय होणार? पश्चिम बंगालच्या राज्यपालांनाही उत्सुकता

कोलकता : राज्यात मुख्यमंत्री कोण होणार, कुणाचे सरकार बनणार, मी पुन्हा येईल ही घोषणा कितपत खरी ठरते, वाघाच्या हातातील कमळ केंव्हा निघणार अशी चर्चा आणि उत्सुकता जशी राज्यातील जनतेला आहे, तशीच ती हजार किलोमीटर दूर असलेल्या पश्चिम बंगालच्या राज्यपालनाही आहे.

राज्यपाल जगदीप धनकड यांनी शुक्रवारी (ता.८) 'सकाळ'सह निवडक माध्यमांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. गप्पा मारताना त्यांनी नकळत महाराष्ट्रात काय होणार असा प्रश्न विचारला. अर्थातच सद्य स्थितीतील राजकारण आम्ही त्यांना सांगितले. पण, जेंव्हा त्यांना राज्यातील राजकारणावर प्रश्न विचारला तेंव्हा त्यांनी आपल्या वकिली खाक्यात मी राजकारणावर टिप्पणी करत नाही असे सांगितले. ते म्हणाले,"मी पश्चिम बंगालमध्ये असताना देशातील इतर राज्यांबद्दल बोलत नाही. तसेच राज्याबाहेर असताना पश्चिम बंगालबद्दल बोलत नाही."

त्यांनी आमचा प्रश्न जरी टाळला तरी राज्यातील राजकारणाच्या सद्यःस्थितीबद्दल त्यांना प्रचंड उत्सुकता आहे. मूळचे राजस्थानचे असलेले धनकड हे भाजपचे नेते होते. सध्या पश्चिम बंगाल सारकाराच्यासोबत त्यांचे चालले गृहयुद्ध सर्वानाच माहित आहे. राज्य सरकार केंद्राच्या योजनांची नीट अंमलबजावणी करताना उदासीन असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पश्चिम बंगालला उत्कृष्ट आणि वैभवशाली सांस्कृतिक आणि वैज्ञानिक विरासात असल्याचे ते म्हणाले. सर्वात जास्त जागतिक वैज्ञानिक, नोबेल पुरस्कार विजेते आणि भारतरत्न या भूमीचे असल्याबद्दल त्यांनी गर्व झाल्याचे सांगितले. राजनिकांताचे मोठे फॅन असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com