तुरुंगाबाहेरही सीसीटीव्हीची नजर

मंगेश सौंदाळकर
शुक्रवार, 13 जुलै 2018

मुंबई - पुण्याच्या येरवडा कारागृहातील तुरुंगाधिकाऱ्यावर पाच दिवसांपूर्वी दोन जणांनी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची दखल तुरुंग प्रशासनाने घेतली आहे. अशा घटना रोखण्याकरिता 12 मार्गदर्शक सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर फिरणाऱ्या संशयास्पद लोकांवर नजर ठेवली जाणार आहे.

तुरुंग प्रशासनाच्या अंतर्गत राज्यात नऊ मध्यवर्ती, 31 जिल्हा, तर 13 खुली कारागृहे आहेत. किरकोळ ते गंभीर गुन्ह्यांत अटक केलेल्या कैद्यांना शिस्त लावली जाते. काहींना शिस्त पसंत नसल्याने ते तुरुंगाधिकाऱ्यांचा राग मनात ठेवतात. पाच दिवसांपूर्वी येरवड्याच्या तुरुंगाधिकाऱ्यांवर दोन जणांनी गोळीबार केला होता. तांत्रिक माहितीवरून स्थानिक पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांना गजाआड केले.

आरोपींच्या चौकशीत काही धक्कादायक माहिती समोर आली. येरवड्यातील घटनेची दखल तुरुंग प्रशासनाने घेतली आहे. त्यानुसार 12 मार्गदर्शक सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

नव्या सूचनांनुसार...
- संशयास्पद फिरताना कोणी आढळल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिसांना देणार.
- तुरुंगात जाताना अधिकाऱ्यांनी सोबत शस्त्र ठेवावे.
- कर्मचाऱ्यांनी काठी आणि हातकड्यांसह हेल्मेट सोबत बाळगावे.
- कैद्यांना बाहेर काढताना अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी एकटे जाऊ नये.
- सकाळी ओपनिंगच्या वेळी कारागृहासमोर दोन्ही बाजूंनी 50 फूट बॅरिकेड करावे.
- पोलिस गार्ड कमी असल्यास त्याची नोंद वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे करावी.

येरवड्याच्या घटनेनंतर तुरुंगाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तुरुंगाबाहेर फिरणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांच्या मदतीने नजर ठेवावी, अधिकाऱ्यांनी सोबत शस्त्र बाळगावे, ओपनिंगला जाताना एकटे जाऊ नये.
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलिस महासंचालक (तुरुंग प्रशासन)

राज्यात...
09 मध्यवर्ती कारागृहे
31 जिल्हा कारागृहे
13 खुली कारागृहे

Web Title: jail cctv watch