जालना "सीड पार्क'च्या कामाला गती द्या - लोणीकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुंबई -जालना येथील प्रस्तावित "सीड पार्क'चे काम गतिमान करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पाणीपुरवठा मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाली. 

या सीड पार्कसाठी जालना शहराला लागूनच सिंदखेडराजा रस्त्यावरील शासकीय मालकीची साधारण 30 हेक्‍टर जागा निश्‍चित करण्यात आली असून, ती ताब्यात घेऊन "सीड पार्क'निर्मितीच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देश या वेळी देण्यात आले. मंत्रालयात झालेल्या या बैठकीस कृषी विभागाचे सचिव विजयकुमार, कृषी आयुक्त विकास देशमुख, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आदी उपस्थित होते. लोणीकर म्हणाले, की जालना परिसरातील बियाणे प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सीड पार्क प्रकल्पाची किंमत अंदाजे 109 कोटी रुपये असून, त्यासाठी जागेचीही पाहणी करण्यात आली आहे. आता एमआयडीसीने ही जागा ताब्यात घेऊन तिथे तातडीने काम सुरू करणे गरजेचे आहे. 

Web Title: Jalna Seed park work