Shambhuraj Desai : जलयुक्त शिवार योजना आजपासून सुरु! शंभूराज देसाईंची मोठी घोषणा, नेमक्या तरतुदी काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shambhuraj Desai : जलयुक्त शिवार योजना आजपासून सुरु! शंभूराज देसाईंची मोठी घोषणा, नेमक्या तरतुदी काय?

Shambhuraj Desai : जलयुक्त शिवार योजना आजपासून सुरु! शंभूराज देसाईंची मोठी घोषणा, नेमक्या तरतुदी काय?

मुंबईः २०१४मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आजपासून ही योजना सुरु होत असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केलं.

जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शिवार पाणीदार करुन शेती समृद्ध करण्याचा मानस सरकारचा होता. या योजनेमध्ये काही प्रमाणात आफरातफर झाल्याची प्रकरणं समोर आलेली होती. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांची चौकशी या प्रकरणात झाली होती.

दरम्यान, आजपासून जलयुक्त शिवाय पुन्हा सुरु होणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. या योजनेमध्ये जेसीबी आणि पोकलेन मशिनला डिझेल परतावा मिळणार आहे.

काय म्हणाले शंभूराज देसाई?

जलयुक्त शिवार योजनेचा टप्पा दोन सुरु झाला आहे. गाळमुक्त धरण योजना राबवण्यात येणार असून या माध्यमातून गाळयुक्त शिवार करण्यात येणार आहे. योजनेच्या माध्यमातून जेसीबी, पोकलेन मशिनला डिझेल परतावा मिळणार आहे.

दरम्यान, फडणवीस सरकारच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या योजनेमध्ये अनेक जिल्ह्यात पाणलोट क्षेत्राला गती मिळाली. पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी साठवणूक करुन आणि जमिनीत मुरवून शिवार समृद्ध करण्याचा संकल्प करण्यात आला होता.

टॅग्स :Shambhuraj Desai