β टाळ्यांसाठी जानकरांनी सोडले ताळतंत्र

संजय मिस्कीन
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

हाराष्ट्र हा राजकीय प्रगल्भ व सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखला जोतो. सुजाण व लोकशाहीवादी नेत्यांची जननी म्हणजे महाराष्ट्र. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, गोपीनाथ मुंडे यासारख्या कायम केंद्रस्थानी नेत्यांनी लोकशाहीवादी संस्कृतीचा मार्ग राज्याला दाखवून दिला. बाळासाहेब ठाकरे आक्रमक असले तरी त्यांनी कधीही द्वेषभावनेतून टिका केली नाही. गोपीनाथ मुंडे व शरद पवार हा संघर्ष देशानं पाहिलेला असला तरी या दोन्ही नेत्यांनी टिकाटिप्पणीत कधीच पातळी घसरू दिली नाही.

हाराष्ट्र हा राजकीय प्रगल्भ व सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखला जोतो. सुजाण व लोकशाहीवादी नेत्यांची जननी म्हणजे महाराष्ट्र. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, गोपीनाथ मुंडे यासारख्या कायम केंद्रस्थानी नेत्यांनी लोकशाहीवादी संस्कृतीचा मार्ग राज्याला दाखवून दिला. बाळासाहेब ठाकरे आक्रमक असले तरी त्यांनी कधीही द्वेषभावनेतून टिका केली नाही. गोपीनाथ मुंडे व शरद पवार हा संघर्ष देशानं पाहिलेला असला तरी या दोन्ही नेत्यांनी टिकाटिप्पणीत कधीच पातळी घसरू दिली नाही.

पण भगवानगडावर मंत्री महादेव जानकर यांनी जी भाषा वापरली त्यावरून या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘विदुषीकरण‘ सुरू झाल्याची साक्ष पटली.

जानकरांची भाषा केवळ द्वेषमुलकचं नव्हती तर ती राजकीय नेत्याला शोभणारीही नव्हतीचं. एका जबाबदार मंत्र्याला तर साजेशी बिल्कुलच नव्हती.

जानकर हे जेष्ट नेते कांशीराम यांच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित कांशीराम यांनी लोकशाहीची मुलतत्वे तळागाळात रूजावीत यासाठी आयुष्य वाहिले. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेवून ते लढले. पण त्यांचे अनुयायी जानकर मात्र हे तत्व विसरलेत.

सत्तेची हवा डोक्यात गेल्यावर काय होवू शकते हे जानकरांची भाषा ऐकल्यानंतर लक्षात येते. विरोधी पक्ष म्हणजे दुष्मन नसून लोकशाहीतला सक्षम स्पर्धक असतो. मतभेदावर आधारित राजकारण होत असले तरी मनभेदांवर ते जाणार नाहीत याची दक्षता नेत्यांनी घ्यावी लागते.

जानकर हे उच्चविद्याविभूषित आहेत. एका मोठ्या वंचित समाजाचे ते नेते आहेत. या समाजामुळेच ते मंत्रीपदावर पोचले आहेत. पण मंत्रीपदी असताना एखाद्या विरोधकाला ‘हरामखोर‘ म्हणणे हे या समाजातल्या सुजाण नागरिकांनाही पटणार नाही. टाळ्या मिळवणं सोपं असलं तरी टाळ्यांसाठी ताळतंत्र विसरून शिवीगाळीच्या भाषेत बोलणं हे जानकरांना शोभत नाही.

सत्तेत आहोत म्हणजे सर्व प्रशासन चाकर आहे हा जानकर यांचा समज म्हणजे बाळबोधपणा आहे. सत्तेच्या जोरावर प्रशासनाला जाहीर सभेत बेतालपणे बोलून जाणकर यांनी मंत्रीपदाच्या शपथेचा एकप्रकारे भंगच केला आहे.

जानकर हे निष्कलंक असतील. ब्रम्हचारी असतील. भ्रष्टाचार विरोधात आवाज बुलंद करणारे असतील. पण याचा अर्थ कोणत्याही राजकीय विरोधकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जावून भाष्य करण्याचा त्यांना अधिकार मिळाल्याची भावना म्हणजे बौध्दीक दिवाळखोरीचं लक्षणचं आहे.

महाराष्ट्रात अशाप्रकारचं राजकीय वातावरण म्हणजे एका महान संस्कृतीत लपटलेल्या राज्याचं ‘विदुषीकरण‘चं म्हणावं लागेल.

ज्या राज्यातला युवक जगभरात बुध्दीच्या व शिक्षणाच्या जोरावर स्वत:ची छाप पाडत असताना या राज्याच्या एका मंत्र्याने अशा भाषेचा आधार घेवून बेताल होवून बोलणं हा विचार नाही. तो या युवा वर्गाला पटणार पण नाही. हे सर्व एकप्रकारचे राजकीय वगनाट्य आहे. ते कसे साकारायचे याचा सर्वस्वी अधिकार जानकरांना असला तरी त्यांनी संयम बाळगून राज्याचा सुसंस्कृतपणा, विद्वेषाच्या राजकारणाचा पाया होणार नाही याची काळजीपण जानकरांनीच घ्यायला हवी.

Web Title: Janakaranni left for talyam talatantra