जंजिरा किल्ल्यावर फडकला तिरंगा

Janjira-Fort
Janjira-Fort

मुरूड (जि. रायगड) - ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर तिरंगा आता कायमस्वरूपी फडकणार आहे. केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडून यासाठी परवानगी मिळाल्यानंतर रविवारी किल्ल्यावर ढोल-ताशांच्या गजरात आणि अलोट उत्साहात राष्ट्रध्वज अनावरण सोहळा पार पडला. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते किल्ल्यावर तिरंगा फडकावण्यात आला. या सोहळ्याला पाच हजारांहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता.

जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा फडकावा, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानाने केंद्रीय पुरातत्त्व खात्याकडे पत्रव्यवहार केला होता. ५५० लोकप्रतिनिधींच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले होते. गेले सहा महिने प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे आणि राज्य कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत पाठपुरावा करण्यात आला. त्याला अखेर यश येऊन रविवारी सरकारतर्फे किल्ल्यावर तिरंगा फडकवण्यात आला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रायगड पोलिस बॅंड पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या वेळी किल्ल्याचा परिसर ढोल-ताशांच्या गजराने दणाणून गेला होता. किल्ल्याच्या चहूबाजूला रांगोळ्या, तसेच फुलांच्या माळांनी सर्व परिसर सजवला गेला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com