40 दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

सिकंदर मुलतानी (वय २८, रा. नागरमुन्नोळी) असे मृत जवानाचे नाव आहे. सिकंदर हे सैन्यदलातून 40 दिवसांच्या सुट्टीवर आले होते. ते सैन्यात मद्रास इंजिनियर ग्रुपमध्ये ९ वर्षांपासून पंजाब येथे कार्यरत होते. घटनास्थळी चिक्कोडी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.

चिक्कोडी : उसाच्या ट्रॉलीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर असलेला जवानाचा मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर नागरमुन्नोळी (ता. चिक्कोडी) येथे शनिवारी (ता. १९) सकाळी ही घटना घ़डली.

सिकंदर मुलतानी (वय २८, रा. नागरमुन्नोळी) असे मृत जवानाचे नाव आहे. सिकंदर हे सैन्यदलातून 40 दिवसांच्या सुट्टीवर आले होते. ते सैन्यात मद्रास इंजिनियर ग्रुपमध्ये ९ वर्षांपासून पंजाब येथे कार्यरत होते. घटनास्थळी चिक्कोडी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Jawan Died in Accident in Chikkodi