जवान राहुल चव्हाण यांना 'सेना पदक' जाहीर

Jawan Rahul Chavan
Jawan Rahul Chavan

मांगूर : ढोणेवाडीसारख्या ग्रामीण भागातून देशसेवेचे व्रत मनाशी बाळगून गेल्या सहा वर्षांपासून जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असलेल्या ढोणेवाडी (ता. निपाणी) येथील जवान राहुल चव्हाण यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी 'सेना पदक' जाहीर झाले आहे. 15 जानेवारी 2019 रोजी होणाऱ्या 'आर्मी डे' दिवशी ते प्रदान करण्यात येणार आहे.

ढोणेवाडीसारख्या ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या राहुल चव्हाण यांनी बिकट परिस्थितीवर मात करून 'देशसेवा हीच ईश्वरसेवा' हे मनाशी बाळगून गेल्या सहा वर्षांपासून जम्मू काश्मीर भागात देशसेवा करत आहेत. आतापर्यंत त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा देखील केला आहे.

ढोणेवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर कारदगा येथील डीएस नाडगे हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हुपरी येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

लहानपणापासूनच देश संरक्षणासाठी मिलिटरीमध्ये जाण्याचा मनामध्ये मानस होता. त्यामुळे त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी कसोशीने सराव सुरू केला. मनामध्ये देशसेवेची प्रभव इच्छा असल्यामुळे त्यांनी जिद्दीने भरतीमध्ये उतरून 19 जून 2013 ला भारतीय सैन्य दलात त्यांची निवड झाली. प्रारंभी बेंगलोरमध्ये त्यांनी सेवा बजावली. त्यानंतर जम्मू काश्मीर येथील बडगाम जिल्ह्यामध्ये त्यांनी देशसेवा बजावली.

गेली सहा वर्षे ते देशसेवा बजावत असून ते दोन दहशतवाद्यांचा खात्मा केले आहेत.त्यामुळे शौर्य श्रेणीतील सेना पदक मागील वर्षी काश्मीर येथे दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना या पदकाने सन्मान करण्यात येणार असून, सेना पदक हे भारतीय सैन्यासाठी एक असामान्य कौतुक पदक म्हणून दिले जाते.

जवान राहुल चव्हाण यांच्या या यशस्वी कारकिर्दीमध्ये नेहमीच त्यांना त्यांचे आई विमल, वडील कृष्णा, पत्नी स्नेहल, याचबरोबर मित्र परिवार व मेजर विजेश कुमार यांचे विशेष सहकार्य मिळत असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com