Jaykumar Gore: जीवघेण्या अपघातातून वाचलेल्या जयकुमार गोरेंची विधानभवनात जोरदार एंट्री, हातात वॉकर...

तब्येत सांभाळून मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम करणार म्हणत अधिवेशनाला दर्शवली उपस्थिती
Jaykumar Gore
Jaykumar GoreEsakal

मोठ्या अपघातातून वाचलेले भाजपचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे हे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी ‘वॉकर’च्या साहाय्याने विधानमंडळामध्ये दाखल झाले. खरं तर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असूनही मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी आमदार गोरे अधिवेशनासाठी हजर झाले आहेत.

विधानभवनात आल्यानंतर आमदार जयकुमार गोरे म्हणाले की, मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे आहेत. एवढ्या मोठ्या अपघातातून जनतेच्या आशीर्वादामुळे मला पुनर्जन्म मिळाला आहे. मतदारसंघाच्या कामासाठी व राज्यातील जनतेच्या विकासासाठी अधिवेशनात माझा पुढाकार असणार आहे. माझ्या मतदारसंघातील कामे महाविकास आघाडी सरकारने थांबवली होती. मात्र, आता नव्या सरकारमुळे ती कामे पुन्हा सुरू झाली आहेत. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण अधिवेशन पुन्हा पुन्हा नसते. तब्येत सांभाळून मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम मी करणार आहे असं जयकुमार गोरे म्हणले आहेत.

Jaykumar Gore
Nana Patole : "तडीपार लोकांना सोबत घेऊन कसबा पेठेत दहशतवाद निर्माण केली" नाना पटोले गरजले

नियमानुसार विधानभवनाच्या पायऱ्यापर्यंत कार आणता येत नाही, त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांना वॉकरच्या सहाय्याने विधीमंडळामध्ये यावे लागले. डिसेंबरपासून गोरे हे रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांची तब्येत अजूनही पूर्णत: बारी झालेली नाही. तरीसुद्धा ते अधिवेशनासाठी विधीमंडळात आले आहेत.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या काळात सुटीच्या दिवशी मतदारसंघात परत जात असताना पुणे-पंढरपूर रस्त्यावर सातारा जिल्ह्यातील मलठण (ता. फलटण) येथे २४ डिसेंबर २०२२ ला त्यांचा अपघात झाला होता. बानगंगा नदीच्या पुलावरुन जयकुमार गोरे यांची गाडी सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली होती. सुदैवाने या मोठ्या अपघातातून ते वाचले होते.

Jaykumar Gore
Kasba Bypoll Election : कसबा निवडणुकीत मोठा ट्विस्ट, कसब्यातील दोन्ही उमेदवारांवर गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com