अजितदादा स्पष्ट वक्ते व भावूक : जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत आणि प्रशासनात कठोर निर्णय घेतात. तसेच ते भावूकही आहेत. पवारांसाहेबांसोबत गेल्या काही दिवसांत खोटेपणाच्या घटना घडल्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले.

मुंबई : अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत आणि प्रशासनात कठोर निर्णय घेतात. तसेच ते भावूकही आहेत. पवारांसाहेबांसोबत गेल्या काही दिवसांत खोटेपणाच्या घटना घडल्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले.

शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पवारसाहेब ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याची भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्रातून मुंबईत समर्थक आले होते. त्यानंतर त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचे टाळले. सायंकाळी अजित पवारांचा राजीनामा दिल्याची माहिती आली. दादा स्पष्ट वक्ते आहेत आणि प्रशासनात कठोर निर्णय घेतात. तसेच ते भावूकही आहेत. पवारांसाहेबांसोबत गेल्या काही दिवसांत खोटेपणाच्या घटना घडल्या आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर बेपत्ता असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवार) तब्बल 19 तासांनंतर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहचले याठिकाणी त्यांची कौटुंबिक चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेणार हे स्पष्ट झाले होते. तर, शरद पवार यांनी हसत-हसत अजित पवार सर्व माहिती देतील असे म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil describes Ajit Pawar as straight forward and emotional person