अजित पवारांची पक्षनेतेपदावरून हकालपट्‌टी; जयंत पाटील यांच्याकडे सूत्रे

टीम ई-सकाळ
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते पदाचे सर्व संविधानिक अधिकार आमदार जयंत पाटील यांना देण्याच्या निर्णयावरदेखील या बैठकीत शिक्‍कामोर्तब करण्यात आले. 

मुंबई : भारतीय जनता पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचा अजित पवार यांनी एकाकी निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून त्यांची शनिवारी सायंकाळी हकालपट्‌टी करण्यात आली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. या वेळी 54 पैकी 50 आमदार उपस्थित होते. या बैठकीत अजित पवार यांनी घेतलेली भूमिका पक्षविरोधी असून, पक्षाची ध्येय व धोरणे यांच्याशी सुसंगत नसल्याचे ठरावात नमूद करण्यात आले. या कारणास्तव अजित पवार यांची विधिमंडळ पक्षनेते पदावरून हकालपट्‌टी करण्यात आली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अजित पवार यांच्यावर पुढील कारवाई करण्याचे सर्वाधिकार शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे देण्याचा ठरावदेखील या बैठकीत संमत करण्यात आला. अजित पवार यांना विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून लाभलेले सर्व अधिकार रद्‌द करण्यात आले असून, त्यांना पक्षादेश काढण्याचा कोणताही अधिकार राहणार नसल्याचे, या ठरावात स्पष्ट करण्यात आले आहे.

No photo description available.

अजित देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा?

दरम्यान, राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षनेते पदाचे सर्व संविधानिक अधिकार आमदार जयंत पाटील यांना देण्याच्या निर्णयावरदेखील या बैठकीत शिक्‍कामोर्तब करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil elected as NCP Party leader