राज्यावर तब्बल एवढ्या कोटींचे कर्ज; जयंत पाटील यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

राज्यसरकारवर तब्बल 4 लाख 71 हजार कोटी आणि वेगवेगळ्या प्रकल्पांचे 2 लाख कोटी असे एकूण 6 लाख 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

मुंबई : राज्यसरकारवर तब्बल 4 लाख 71 हजार कोटी आणि वेगवेगळ्या प्रकल्पांचे 2 लाख कोटी असे एकूण 6 लाख 71 हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

कर्जाच्या या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आज बैठकही झाली बोलवली असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. बुलेट ट्रेन पांढरा हत्ती आहे. बुलेट ट्रेन सारखे काही प्रकल्प नंतर करता येतील का याचा विचार आम्ही करत असल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना पाटील म्हणाले की, खातेवाटपासंदर्भात कुठलाही घोळ नाही. लवकरच निर्णय होईल. तो मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे.

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा

भाजप सरकारच्या काळातील प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीपूर्वी ते बोलत होते. बैठकीत राज्यात कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत. त्याची सद्यस्थिती काय आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च किती आहे, त्यावर आतापर्यंत किती खर्च झालेला आहे. कोणते प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करणं गरजेचं आहे. याबाबत या बैठकीत आढावा घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पानिपतच्या कलाकारांची पुण्यात रंगली मैफल

यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, 'नवीन सरकार आल्यानंतर काम करत असताना मुख्यमंत्री कोणकोणते प्रकल्प चालू आहेत त्याचा आढावा घेतात. या प्रकल्पांची प्रगती कुठपर्यंत आली आहे, काय अडचणी आहेत हे जाणून घेत असतात. त्यात नवीन असं काही नाही. प्रकल्पांसाठी किती खर्च येणार आहे, यावर पूर्ण अहवाल येईल त्यावर विचारविनिमय होईल. बुलेट ट्रेन पांढरा हत्ती आहे काय, तर माझं मत होय असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil says Maharashtra has Rs 6 lakh 71 thousand crore of debt burden