शरद पोंक्षेबद्दल जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा, म्हणालेत...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई : अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पोंक्षे यांचा राष्ट्रवादीशी कधीच संबंध नव्हता आणि यापुढेही कधीच नसेल, असा खुलासा जयंत पाटील यांनी केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे.

मोठी बातमी - रुग्णवाहिकेशी केला संपर्क, मागितले अवाच्या सव्वा पैसे, शेवटी ओढवली 'ही' वेळ; मुख्यमंत्रीसाहेब पाहताय ना ?

 

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात 30 लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.

मोठी बातमी - कोरोनात आकस्मिक मृत्यू टाळण्यासाठी डॉक्टरांकडून वापरला जातोय 'हा' महत्त्वाचा पर्याय...

जयंत पाटील यांनी यावर ट्विट करून खुलासा केला आहे. महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार हे देखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे, असं परखड मतही त्यांनी व्यक्त केलं. शरद पोंक्षे हे प्रदीप दळवी लिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’या नाटकात नथुराम गोडसेची भूमिका करत असत. पोंक्षे कायमच गांधी हत्येचे समर्थन करत आलेत.

jayant patil on sharad ponkshe and his visit to NCP office read full news


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant patil on sharad ponkshe and his visit to NCP office read full news