अधिवेशनाआधीच जयदत्त क्षिरसागरांना मंत्रिपदाची लॉटरी?

अधिवेशनाआधीच जयदत्त क्षिरसागरांना मंत्रिपदाची लॉटरी?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना आरोग्य मंत्रीपद मिळणार असल्याचे समजते आहे. आरोग्य खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय शिवसेनेला आणखी दोन राज्य मंत्रीपदं देऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

जयदत्त क्षिरसागरांना आरोग्य मंत्रिपद दिल्यास त्यांनी घड्याळ सोडून शिवबंधन बांधल्याचा फायदा त्यांना होणार असून अधिवेशनाआधीच मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. सोबतच, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री पद देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आठवडाभर आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री तर जयदत्त क्षिरसागर यांना आरोग्य मंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

उपमुख्यमंत्री पदासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची ही जोरदार चर्चा होती. मात्र शिवसेनेतून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झालेले नेते पक्ष सोडून गेल्याने ठाकरे कुटुंबातील आदित्यला उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com