जेईई मेन्सच्या अर्जासाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

असे आहे वेळापत्रक
अर्ज भरण्याची मुदत - ६ मार्चपर्यंत
अर्जात दुरूस्तीची संधी - ८ ते १२ मार्च
प्रवेशपत्राची उपलब्धता - २० मार्च
परीक्षा कालावधी - ५ ते ९ एप्रिल व ११ एप्रिल
निकालाची संभाव्य दिनांक - ३० एप्रिल

नाशिक - राष्ट्रीय स्तरावरील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी जॉइंट एंट्रन्स एक्‍झाम (जेईई) मेन्स परीक्षा देणे बंधनकारक आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेन्सला प्रविष्ठ होण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांना येत्या ६ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) यांच्यातर्फे जेईई मेन्स परीक्षेचे संयोजन केले जाते. गेल्या वर्षीपासून ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. जानेवारीत एकदा परीक्षा झालेली असून, विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांना बसण्याची मुभा असते. एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेन्ससाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, ६ मार्चपर्यंत अर्जाची मुदत व निर्धारित शुल्क भरण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत असेल. यापूर्वी जानेवारीमध्ये झालेल्या जेईई मेन्स परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना नव्याने लॉग-इन तयार करण्याची गरज नाही. यापूर्वीच्या अर्जात दुरुस्तीसाठी ८ ते १२ मार्चदरम्यान मुदत उपलब्ध करून दिली जाईल. अशा उमेदवारांनी आपली वैयक्‍तिक माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतर आवश्‍यक माहिती व कागदपत्रांची उपलब्धता करायची आहे. तिसऱ्या टप्प्यात शुल्क भरल्यानंतर परीक्षेला प्रविष्ठ होता येणार आहे. यापूर्वी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्जासोबत वैयक्‍तिक स्वरूपाची व अन्य सविस्तर माहिती पुरवावी लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jee mains application extension till 6th March