'जिओ'चा स्पीड दुप्पट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 एप्रिल 2017

मुंबई - बाजारातील स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओचा इंटरनेटचा स्पीड दुप्पट असल्याची माहिती "ट्राय'ने दिलेल्या अहवालातून समजली आहे. रिलायन्स जिओचा सरासरी इंटरनेटचा स्पीड हा 16.48 एमबीपीएस इतका होता. तुलनेत इतर स्पर्धक कंपन्यांमध्ये आयडिया 7.66 एमबीपीएस आणि भारती एअरटेलचा स्पीड हा 7.66 एमबीपीएस इतका होता. व्होडाफोनचा सरासरी वेग हा 5.66 एमबीपीएस, टाटा डोकोमोचा 2.52 एमबीपीएस व बीएसएनएलचा स्पीड 2.26 एमबीपीएस इतका होता. ट्रायने "मायस्पीड ऍप्लिकेशन'चा डेटा वापरत रिअल टाईमवर आधारित ही माहिती गोळा केली आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत 1.3 अब्ज डेटापॉईंटचा समावेश करण्यात आला होता. तसेच 93 हजार 464 ग्राहकांचा समावेश या सर्वेक्षणात होता. डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले.
Web Title: jio speed double