सरकार तुमचं व्हॉटसअ‍ॅप चॅट, SMS वाचतंय - जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad
Jitendra Awhad
Summary

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टविटरवरून मोदी सरकारवर टीका करताना नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई - पेगॅसस प्रकरणावरून संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोठा गोंधळ सुरु आहे. यामुळे संसदेचं कामकाजही व्यवस्थित झालेलं नाही. भारतातील राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यानतंर विरोधकांकडून सातत्यानं मोदी सरकारवर टीका केली जात आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचाही फोन हॅक झाला होता. महाराष्ट्रातही अनेक नेत्यांनी पेगॅसस प्रकरणावरून मोदी सरकारवर टीका केली. आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टविटरवरून मोदी सरकारवर टीका करताना नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर म्हटलं की, “सरकार तुमचे व्हॉट्सअॅप चॅट, एसएमएस वाचतंय. तुमचे व्हिडीओ आणि फोटो, इमेल, मेडिकल रेकॉर्ड, पेमेंट हिस्ट्री, संपर्क क्रमांक पाहातंय. पेगॅसस हे फक्त राजकारणी, पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतच मर्यादित नाही. ते तुमच्याबद्दलही आहे. विचार करा”, यात त्यांनी पेगॅसस फक्त ठराविक लोकांचेच नाही तर इतर नागरीकांचे फोनही हॅक करत असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे नागरीकांनी विचार करावा असं त्यांनी म्हटलंय.

Jitendra Awhad
केंद्र-राज्य भेदभाव न करता मदत द्या, शिवसेनेची मोदींकडे मागणी

इस्रायलमध्ये तयार झालेल्या पेगॅससचा वापर करून फोन हॅक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यामध्ये देशातील जवळपास 40 जणांचे फोन हॅक झाले होते. या प्रकरणाची इस्रायल सरकारने चौकशी सुरु केली आहे. तसंच एनएसओच्या कार्यालयांमध्येही चौकशी केली जात आहे. या कंपनीच्या स्पायवेअरचा वापर करून अनेक देशांनी पाळत ठेवण्याचा प्रकार केल्यानं जगभरात याला विरोध होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com