
Jitendra Awhad Video : जितेंद्र आव्हाडांचं रॅप साँग ऐकलं का? अरे पचास खोका...
मुंबईः मुंबईतल्या बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाली. या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एक रॅप साँग गायलं.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पन्नास खोक्यांवर रॅप साँग बनवल्याने मुंबई-पुण्यातल्या तरुणांना सरकारने जेलमध्ये टाकलं. परंतु आज मीच एक रॅप साँग बनवलं आहे.
अरे पचास खोका...
अरे पचास खोका तुमने खाया.. महाराष्ट्रने क्या पाया
अरे पचास खोका ...
लडके ने उसके गले पे लाया, तो पुलिसने उसे जेल में लाया
अरे पचास खोका तुमने खाया.. महाराष्ट्रने क्या पाया
अरे पचास खोका बोलतोही तुम क्यूं चिडते हो
अपनाही रिश्ता पचास खोके से क्यूं जोडते हो
असं रॅप जितेंद्र आव्हाडांनी यावेळी सादर केलं.
बारसु येथील रिफायनरीबद्दल बोलतांना आव्हाड म्हणाले की, रिफायनरी कोकणातच करण्याचा अट्टहास का आहे? बारसु येथील आंदोलन वाईट पद्धतीने चिरडण्याचं काम करण्यात येत आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणातील मुद्दे...
बारसुमध्ये महिलांना आमानूषपणे मारहाण करण्यात आली
आंदोलन चिरडलं जात नाही, ते जास्त उफाळतं
रिफायनरी कोकणामध्ये कशासाठी?
३०-३५ वर्षे रखडलेला बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरु केला
आता कुणाविरुद्ध काही बोलायचं राहिलचं नाही
बोललं की आत टाकलं जातं
परिस्थितीविरुद्ध लढणं हाच खरा विद्रोह असतो
पुण्यातल्या रॅप साँगवर कारवाई करुन अन्याय केला
तुम्ही पन्नास खोके घेतले पण महाराष्ट्राला काय मिळालं
महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र राहिली तर कुणाचा बाप रोखू शकणार नाही