तुम्हाला पाच हजार वर्षे आरक्षण होते - आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली.

मुंबई - तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली.

आरक्षणाने समाजाची प्रगती होते, हे खरे नाही. आजवर ज्या समाजाने जास्तीत जास्त आरक्षणाचा लाभ घेतला, त्या समाजाची प्रगती झाली नाही, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी मांडले होते; यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गडकरी यांच्यावर ट्‌विटरवरून टीका केली आहे. आव्हाड यांनी म्हटले आहे की, ‘‘साहेब, तुम्हाला पाच हजार वर्षे अघोषित आरक्षण होते तेव्हा आम्ही शाळेच्याच नाही, तर गावकुसाच्यासुद्धा बाहेर होतो. तुमच्या पिढ्यान्‌ पिढ्या हजारो वर्षे शिकत होत्या, तेव्हा आमचे पूर्वज मैला वाहत होते किंवा रस्त्याच्या कडेला ढोरं धूत होते.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhad Comment on Nitin Gadkari Politics