Jitendra Awhad: "आमचं कुटुंब तणावात"; जितेंद्र आव्हाडांच्या मुलीची भावनिक विनंती

जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Natasha Awhad
Natasha Awhadesakal

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यापासून जितेंद्र आव्हाडांवर अनेक प्रकरणावरुन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशातच, त्यांची मुलगी नताशा आव्हाड हिने भावनिक विनंती केली आहे. यापूर्वी त्यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली होती. (Jitendra Awhad daughter Natasha Awhad reaction on Crime Regarding Women Case Registered )

एका वृत्तसंस्थेशी बोलताना नताशा आव्हाडने भावनिक भाष्य केलं आहे. 'आम्ही खुप डिस्टर्ब झालो आहोत. वडिलांवर झालेल्या आरोपामुळ संपूर्ण कुटूंब तणावत आहे. मानसिक त्रास झाला आहे. महिलांसाठीच्या कायद्याचा गैरवापर करु नका' अशी विनंती नताशाने केली आहे.

तत्पूर्वी, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषद घेत आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली. माझ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवताना आयपीसी 354 कलम लावले. हे माझ्या मनाला लागले असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. समाजामध्ये माझी बदनामी व्हावी, यासाठीच हा षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावेळी बोलताना आव्हाड भावूक झाले. इतक्या खालच्या पातळीचा राजकारण होऊ नये, घरे उद्धवस्त होतील असेही आव्हाड यांनी म्हटले होते.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कळव्यातल्या एका पुलाच्या उद्घाटनाला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाडही होते. त्यावेळी मुख्यमंत्री बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीबाहेर गर्दी झाल्याचं या व्हिडीओ समोर आला. . त्यावेळी जितेंद्र आव्हाड गर्दीतून वाट काढत होते. काही लोकांना बाजूला सारत होते. त्यावेळी ही महिलाही समोर आली. तिच्या खांद्याला हात लावून आव्हाडांनी या महिलेला बाजूला सारलं.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही येत आहे. शिवसेनेच्या विदर्भातल्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. जबरदस्ती तुमचा रस्ता कोणी रोखणारं बाजूला व्हा सांगून ऐकत नसेल तर तुमच्यावरच गुन्हा दाखल होणार का?, असंही त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com