
Jitendra Awhad : शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी; जितेंद्र आव्हाड यांचं विधान
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी अनेक मुद्दांवर भाष्य केलं.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, एकिकडे राज्यात शेतकरी दुष्काळग्रस्त झालेला असतानाच शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र शासन आपल्या दारी आणि महाराष्ट्र झाला भिकारी अशी स्थिती सत्ताधाऱ्यांकडून निर्माण करण्यात आल्याची टीका आव्हाड यांनी केली.
यावेळी त्यांनी गणेशोत्सवात लोकल रेल्वे २४ तास सुरू ठेवण्याची मागणी केली. गणेशोत्सवात अनेक भाविक मुंबई आणि परिसरातील गणेशोत्सवांना भेटी देत असतात. परिणामी घरी परतण्यासाठी वाहनांची उपलब्धता नसल्याने गणेश भक्तांचे हाल होतात. त्यामुळे 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबरपर्यंत लोकल रेल्वे 24 तास सुरू ठेवा.
दरम्यान कोकण हायवेवर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दोन अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू करा, यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन दिल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं.