सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून राज ठाकरेंची सभा : जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Replied Raj Thackeray
Jitendra Awhad Replied Raj Thackerayesakal

मुंबई : राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी अल्टीमेटम दिला आहे. तसेच त्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर देखील टीका केली होती. त्यालाच आता आव्हाडांनी (Jitendra Ahwad Replied Raj Thackeray) प्रत्युत्तर दिलं आहे. भोंग्याबद्दल इतकं प्रेम आहे तर सभा का घेतली? जिथं सभा घेतली तिथे एका बाजूला शाळा आहे आणि दुसऱ्या बाजूला विद्यालय आहे. सर्वोच्च न्यायालय सांगतेय, की शाळेच्या शंभर मीटर च्या आजूबाजूला भोंगे लावू नका. मग तुम्ही न्यायालयाच्या नियमाचे उल्लंघन केले आहे, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

Jitendra Awhad Replied Raj Thackeray
दिवा विझताना मोठा होतो! राऊतांचा राज ठाकरेंना टोला

'राज ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागावी' -

पेशवे नव्हते हे तुम्ही कसं काय म्हणू शकता? जिंकले तर पेशवे आणि हारले तर मराठा? हा जातीय मतभेद कोणी निर्माण केला? पेशव्यांवर चित्रपट निघतात. हे सर्व तुम्ही कधी बोलणार? दुसऱ्याची टिंगल-टवाळी करणं हे कधी सोडणार? तुम्हाला महागाई, पेट्रोल-डिझेलचे दर दिसत नाही का. तुम्ही महागाईवर गप्प का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना केला. भोंग्याबद्दल प्रेम आहे, तर तुम्ही सभा का घेतली? सायलंट झोनमध्ये तुम्ही सभा घेतली. तुमच्या कार्यकर्त्यांना माहिती नव्हतं का? तिथं शाळा आहे. तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाबद्दल मान-सन्मान नाही का? याबाबत तुम्हाला महाराष्ट्र आणि सर्वोच्च न्यायालयाची माफी मागावी लागले, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

पवार साहेबांनी जातीवाद वाढवला आणि शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही, असा आरोप राज ठाकरेंनी केला. पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला कोणी विरोध केला? हे तुम्हाला माहिती नाही का? आईला सती न जाऊ देता शिवाजी महाराजांनी सर्व कर्मकांड मोडलंय हे माहिती नाही का? पण, दुर्दैवाने तुम्ही पुरंदरे वाचता. अफजल खानाचा कोथळा काढला याचा सर्व मराठी जनतेला अभिमान आहे. पण, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, असंही आव्हाड म्हणाले.

'राज ठाकरेंमध्ये जातीभेद-वर्णभेद भरलाय'

हाजी अराफत शेख तुमचा मित्र होता. त्याच्या बाजूला बसून तुम्ही अनेकवेळा जेवले. तो दाढी करायचा नाही हे विसरले का तुम्ही? राजसाहेब बोलताना इतिहास, आपल्या बाजूला कोण बसलंय? याचा विचार करा. तुम्ही मुसलमानांना देशद्रोही आणि देशप्रेमी असल्याचं सर्टीफिकेट देणार आहात का? तुमच्यामध्ये जातीभेद आणि वर्णभेद ठासून भरलेय. आम्ही तुम्हाला ढोरपोटे म्हटलं, तर चालेल का? पण, राजकारणात अशी वैयक्तिक टीका करणं योग्य नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

'राज ठाकरे महाराष्ट्राचे जॉनी लिव्हर'

महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यांनी ज्ञानाच्या भरवशावर ते केलंय. त्यांनी पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. शाहू महाराज त्यांचे वारसदार आहे. हे दोघेही माझे आदर्श आहे म्हणत बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. तिघांच्या आचरणात छत्रपती शिवाजी महाराज होते. या तिघांचे नाव घेणे म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेणं आहे. महाराष्ट्रात तुम्हाला जॉनी लिव्हर म्हटलं जातं. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर जिवंत आहात. तुमच्या नावावर त्यांचा शिक्का आहे. त्यामुळे लोक तुम्हाला ऐकतात. हे सर्व गमावून बसू नका, इतकीच तुम्हाला विनंती आहे, असं आव्हाड राज ठाकरेंना म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com