फक्त मुलाखत द्या, मध्य रेल्वे देेतेय तुम्हाला नोकरी

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

जर तुम्ही नर्सिंग पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. मध्य रेल्वेतर्फे स्टाफ नर्स पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मध्य रेल्वे स्टाफ नर्सपदी 31 जणांची भरती करणार आहे.

मुंबई : जर तुम्ही नर्सिंग पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी चालून आली आहे. मध्य रेल्वेतर्फे स्टाफ नर्स पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मध्य रेल्वे स्टाफ नर्सपदी 31 जणांची भरती करणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त मुलाखत द्यावी लागणार असून इच्छुक उमेदवारांना 29 जुलैला थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे. या बाबतची माहिती पुढीलप्रमाणे :

मुलाखत 29 आणि 30 जुलैला होणार आहे. 

शैक्षणिक पात्रता :

1. रजिस्टर्ड नर्स किंवा मिडवाइफचे सर्टिफिकेट हवे.

2. जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये कोर्स केल्याचे सर्टिफिकेट किंवा नर्सिंगमध्ये B.Sc हवे.

वयोमर्यादा :

- 20 ते 40 वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करून थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.

मुलाखत स्थळ : 

उमेदवारांना मुलाखतीसाठी पुढील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. 

पत्ता : चीफ मेडिकल सुपरीटेंडेंट ऑफ‍िस, ड‍िव्हिजनल रेल्वे, हाॅस्पिटल, सेंट्रल रेल्वे, भुसावळ, महाराष्‍ट्र

संकेतस्थळ : 

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://cr.indianrailways.gov.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी.

तसेच रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे 500 हून जास्त उमेदवारांची वेगवेगळ्या पदांवर भरती सुरू करण्यात आली आहे. या पदांमध्ये ज्युनियर इंजीनियर, क्लार्क, स्टेशन मास्टर, नर्सिंग सुप्रिटेंडेंट, लोको इन्स्पेक्टकर आणि सीनियर रेजिडेंट यांचा समावेश आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी www.indianrailways.gov वर अर्ज करावा. या उमेदवारांची भरती सेंट्रल रेल्वे, साउथ वेस्टर्न रेल्वे, नाॅर्थ इस्ट फ्रंटइयर रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, साउथ इस्ट सेंट्रल रेल्वे अंतर्गत केली जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job opening in Central Railway