संविधान सन्मान लढ्यात सहभागी व्हा : मेधा पाटकर

संविधान सन्मान लढ्यात सहभागी व्हा : मेधा पाटकर

पुणे - सध्या लॅपटॉप, मंगळसूत्रे देऊन निवडणुका लढविल्या जात आहेत. संविधानाचा अवमान हा लोकशाहीचादेखील अवमान आहे. त्याच्या सन्मानासाठी प्रत्येकाने लढ्यात सहभागी होण्याची गरज आहे, असे मत नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.

साने गुरुजी स्मारक येथील निळू फुले सभागृहात झालेल्या ‘संविधान सन्मान सभा’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव उपस्थित होते. 

आज सेनापती बापट पुतळा ते पर्वती पायथापर्यंत संविधान सन्मान मिरवणूक काढण्यात आली. लोकशाही, संविधान यांच्यावर आक्रमण, न्यायासाठी विद्वेष, विषमता, हिंसा आणि नैसर्गिक साधनांच्या लुटीच्या विरोधात ‘संविधान सन्मान यात्रा’ ही राष्ट्रव्यापी यात्रा काढली आहे. दांडी ते दिल्ली असा मार्ग असणारी ही यात्रा पुण्यात आली असून त्यात सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.

फक्त संविधान वाचवा, अशी भूमिका घेऊन चालणार नाही. त्यासाठी सत्यशोधक झाले पाहिजे. सद्यःस्थितीत संविधानाच्या मूल्यांचा पराभव होताना दिसत आहे, त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे.
- डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com