पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा 2018 या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा 2018 या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

पत्रकार यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोईफोडे अग्रलेखन पुरस्कार जाहीर करण्यात आला. 51 हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्य शासनामार्फत पत्रकार, छायाचित्रकार आदींना देण्यात येणाऱ्या इतर विविध पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज येथे घोषणा केली.

येत्या 27 जुलै रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात सायंकाळी चार वाजता होणाऱ्या समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या समारंभात 2016 आणि 2017 या सालातील पत्रकारिता पुरस्कारांचे तसेच ‘महाराष्ट्र माझा शेतकरी राजा’ लघुचित्रपट स्पर्धा 2016 आणि ‘महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा’ 2017 आणि 2018 यातील विजेत्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Journalist Pandharinath Sawant will get Lokmanya Tilak lifetime achievement journalism award