
Shivsena History: 'प्रवास आपल्या शिवसेनेचा', ठाकरे गटाने शेअर केला तो व्हिडीओ
Shivsena History: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. बाळासाहेबांना विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून अभिवादनही केलं जात आहे.
बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून सर्व पक्षांनी त्यांचे पोस्टर आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. अशातच शिवसनेच्या ठाकरे गटाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
शिवसनेच्या ठाकरे गटाकडून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 'प्रवास आपल्या शिवसेनेचा' असं कॅप्शन देत शिवसेनेचा संपूर्ण जीवनप्रवास सांगितला आहे.
हे ही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 97 वी जयंती. यानिमित्ताने शिवसेनेकडून प्रवास शिवसेनेचा या आशयाचा एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. त्या व्हिडीओचा पहिला भाग आज शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिवशी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा: Balasaheb Thackeray : 'बाप बापच असतो', ठाकरे गटाने झळकवलेले पोस्टर चर्चेत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सायंकाळी 6 वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
हेही वाचा: Balasaheb Thackrey : बाळासाहेबचं ते! नरेंद्र मोदींचा बाळासाहेब ठाकरेंना वाकून नमस्कार