
६ जून हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा होणार; राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर झाला होता. यामुळे राज्यात सोमवारी (ता. ६) ‘शिवस्वराज्य दिन’ (Shivswarajya Day) साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करतील. (June 6 will be celebrated as Shivswarajya Day)
६ जून म्हणजे शिवराज्यभिषेक दिन (Shivswarajya Day). या दिनालाच राज्य सरकारने ‘शिवस्वराज्य दिन’ असे नाव दिले आहे. शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्त्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन. या दिवशी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करण्यात येईल. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य सरकारने (State Government) केले आहे. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.
हेही वाचा: शिवसेना सावध! सर्व आमदारांना सुरक्षितस्थळी पाठवणार; सोमवारी बैठक
राज्यात ६ जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सर्व शासकीय ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांना सरकारी आदेश जारी करण्यात आले आहेत.
Web Title: June 6 Will Be Celebrated As Shivswarajya Day Decision Of The State Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..