आता ज्युनिअर कॉलेज येणार अडचणीत?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 डिसेंबर 2019

- युवासेनेने केला गंभीर आरोप.

मुंबई : तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात मुंबईत काही कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य मान्यता देण्यात आल्याचा आरोप युवा सेनेने केला आहे. पायाभूत सुविधा नसतानाही तावडे यांनी या कनिष्ठ महाविद्यालयांना मंजुरी दिली असून, या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी युवा सेनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बोरिवली येथील राव कनिष्ठ महाविद्यालयाला पाच ठिकाणी महाविद्यालये सुरू करण्याची मान्यता तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात देण्यात आली. राव महाविद्यालयाने एका इमारतीत भाड्याने खोली घेऊन मान्यता मिळवली आहे. या महाविद्यालयाच्या मान्यतेची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सुमारे 1200 विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्यांचे अर्ज अन्य महाविद्यालयांतून भरून घेतले.

 भाजप सरकारचा 'हा' नियम बदलण्याबाबत अजित पवारांचे सूतोवाच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Junior Colleges may faces Difficulties