esakal | काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठरले; काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील केवळ 'हे' तीन मतदारसंघ
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठरले; काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील केवळ 'हे' तीन मतदारसंघ

- हर्षवर्धन पाटलांना धक्का
- इंदापूर राष्ट्रवादीकडेच
- जुन्नर, पुरंदर, भोर कॉंग्रेसकडे 

काँग्रेस-राष्ट्रवादीचे ठरले; काँग्रेसला पुणे जिल्ह्यातील केवळ 'हे' तीन मतदारसंघ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या जागा वाटपात पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघ कॉंग्रेसला देण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुंरदर, भोर आणि जुन्नर हे मतदारसंघ कॉंग्रेसला देण्यात आले असून इंदापूरची जागा राष्ट्रवादीने स्वत:कडे ठेवली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. 

जनसंकल्पपूर्वीच हर्षवर्धन पाटलांच्या हातात कमळ?

मुंबईत आज विरोधीपक्षनेते विजय वेडट्टीवार यांच्या बंगल्यावर झालेल्या दोन्ही पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेल्याचे समजते. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. 

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हाती कमळ?

भोरमध्ये संग्राम थोपटे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार असल्याने ही जागा कॉंग्रेसकडे अपेक्षित होती. मात्र पुरंदर, जुन्नर या दोनच जागांचा बोनस कॉंग्रेसला मिळाला आहे. पुरंदरमध्ये संजय जगताप, जुन्नरमधून सत्यशील शेरकर आणि भोरमधून थोपटे यांची नावे निश्‍चित मानली जात आहे. 

हर्षवर्धन पाटील घेणार मोठा राजकीय निर्णय

या जागा वाटपातील सूत्रामुळे राष्ट्रवादीकडे इंदापूरची जागा राहिली आहे. त्यामुळे या जागेसाठी आडून बसलेले हर्षवर्धन पाटील उद्याच आपला भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर करण्याची शक्‍यता आहे. तसा संकल्प मेळावा त्यांनी आयोजित केला आहे. इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा विद्यमान आमदार आहे.

loading image
go to top