कबीर कला मंचच्या सचिन माळीला जामीन

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती बाळगल्याच्या आरोपावरून 2011 मध्ये पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. नक्षलवाद्यांना सहकार्य आणि आर्थिक पाठबळ दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

नवी दिल्ली - नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती बाळगल्याचा आरोप असलेल्या 'कबीर कला मंच'च्या सचिन माळी व अन्य तिघांना आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला.

सचिन माळीची पत्नी शीतल साठे हिला यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने माणुसकीच्या तत्त्वातून सशर्त जामीन मंजूर केला होता. सचिन माळी व त्याचे साथीदार गेल्या चार वर्षांपासून कारागृहात होते. सचिन माळी याने मंत्रालयाबाहेर शरणागती पत्करली होती. 

नक्षलवाद्यांबाबत सहानुभूती बाळगल्याच्या आरोपावरून 2011 मध्ये पोलिसांनी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. नक्षलवाद्यांना सहकार्य आणि आर्थिक पाठबळ दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Web Title: kabir kala manch member sachin mali get bail