कादर खान यांची प्रकृती गंभीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 डिसेंबर 2018

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते व लेखक कादर खान यांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे कॅनडातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

कादर खान काही वर्षांपासून मुलगा आणि सुनेसोबत कॅनडात वास्तव्याला आहेत. श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना न्युमोनिया झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले, अशी माहिती मुलगा सरफराज आणि सून शाहिस्ता यांनी दिली. कादर खान यांच्या गुडघ्यावर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती.

त्यांनी "दाग' या चित्रपटापासून अभिनयाला सुरवात केली. 'कुली', "होशियार', "हत्या' आदी चित्रपटांचे त्यांनी लेखन केले असून, 300 हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Web Title: Kader Khan condition serious