कालीचरण महाराजांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य! म्हणाले, "नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते..." - Kalicharan Maharaj | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalicharan Maharaj

Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य! म्हणाले, "नथुराम गोडसेने गांधींबाबत जे केले ते..."

कथित धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.  नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केले ते योग्य केले. नथुराम गोडसे नसते तर देशाचा नाश झाला असता, असे वादग्रस्त वक्तव्य कालिचरण महाराज यांनी केले आहेत.  जितके महात्मा नथुराम गोडसे यांच्याबाबत वाचतील तेवढे ते त्यांचे भक्त होतील, असे देखील कालीचरण महाराज म्हणाले. 

यापूर्वी देखील कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबच वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  रायपुर पोलिसांनी त्यांना मध्यप्रदेशच्या खजूराहोमधून अटक केली होती.

कालीचरण यांनी एका धर्म संसदेत महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेला (Nathuram Godse) नमस्कार करतो असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणात छत्तीसगड पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. 

कालीचरण यांनी महात्मा गांधींवर टीका करताना भाषेची मर्यादा ओलांडत अपशब्दांचा वापर केला होता. या घटनेनंतर देशभरातून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत होती. आता पुन्हा त्यांनी महात्मा गांधींबाबत वक्तव्ये केले आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

राहुल गांधीवर देखील  कालीचरण महाराज यांनी ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले, "राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई योग्य आहे. हिंदू लोक हे राहुल गांधींच्या वोटर बँकचे शत्रू आहेत. हिंदू आता शेळपट नाही राहिला. फालतू सेक्युलरिझम हिंदूंनी सोडून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नपूर्तीसाठी हिंदू एक होत आहे."

देशभरात झालेल्या हिंसाचाराबाबत कालीचरण यांनी गंभीर आरोप केला आहे. "मुसलमानांकडून राम नवमीला दंगली घडवल्या जात आहेत. प्रत्येक दंगल मुसलमान घडवत आहेत. ह्या दंगली नियोजित आहेत.", असा आरोप त्यांनी केला आहे.