दर्यावर राज्य गाजवणाऱ्या कान्होजींविषयीच्या या गोष्टी माहितीये का?

Kanhoji
KanhojiKanhoji

कान्होजी यांचा जन्म १६६९ मध्ये रत्‍नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातल्या हर्णे या गावी संकपाळ कुटुंबात झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे ‘वीर राणा संक’ या संप्रदायाचे होते असे सांगितले जाते. कान्होजींच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई नाव होते. कान्होजींचे (Kanhoji) बालपण हे सुवर्णदुर्गवर सागरी किल्ल्यांमध्ये गेले. हाच किल्ला पुढे त्यांनी काबीज केला.

कान्होजींचे (Kanhoji) वडील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समुद्री सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती. यावरून असे लक्षात येते की, पराक्रमाची परंपरा कान्होजींना त्यांच्या पूर्वजांकडून लाभली होती. पण, त्यांनी आपल्या पराक्रमात कर्तृत्व आणि निष्ठेची भर घालून इतिहासाच्या (History) पटलावर आपले कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहावे असे काम केले होते.

Kanhoji
नवनीत राणांच्या वक्तव्यावर अमरावती आयुक्तांचे उत्तर; कमीत कमी...
  • इ.स. सन १६८८ च्या सुमारास औरंगजेबाचा सरसेनापती असलेल्या सिद्धी कासम याला कान्होजींच्या जिद्द आणि अभ्यासपूर्ण योजनेपुढे हार मानावी लागली होती.

  • स्वराज्यातील लोकांना आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणाऱ्या मोगलांचे स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम कान्होजी यांनी केले आहे.

  • १६९८ मध्ये कान्होजींनी आपला पहिला नाविक तळ विजयदुर्ग या सागरी किल्यावर स्थापन केला.

  • पुढे कान्होजी यांनी सुवर्णदुर्गाचा लढा यशस्वी करून आपल्या पराक्रमास सुरुवात केली. आणि मोघलांकडून आपले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली.

  • कालांतराने छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांचे अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी कान्होजीच्या खांद्यावर आली. अत्यंत पराक्रमाने आणि हुशारीने ते शत्रूला तोंड देत होते. त्याच्या या कामावर खूश होऊन राजाराम महाराजांनी कान्होजी यांना सरखेल हे सन्मानाचे पद बहाल केले.

  • कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला शत्रूकडून जिंकून घेऊन आपली राजधानी कुलाबा किल्ल्यावर थाटली.

  • पुढच्या काही काळातच छत्रपती राजाराम महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना आपल्या आरमाराचा प्रमुख म्हणून घोषित केलं आणि मग तेव्हा कान्होजी आंग्रे हे कोकण किनाऱ्याचे राजे झाले.

  • इ.स १७०० मध्ये महाराणी ताराराणींनी देखील कान्होजी यांना सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी दिली होती.

  • पुढे १६९८ नंतर मराठी राज्याचं सगळं आरमार कान्होजीकडे आलं. त्यामुळे सर्व परकीय शत्रूंनी एकत्र येऊन कान्होजीना संपवण्याचा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला.

  • स्वराज्याचे आरमार अधिक शस्त्रसज्ज करण्यासाठी त्यांनी शस्रनिर्मितीचा कारखाना तयार केला. विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारित पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने उभे केले. यामुळे कान्होजी दर्यावर राज्य करू लागले.

  • १७१३ साली कान्होजींनी ब्रिटिशांकडून आपले १० किल्ले हस्तगत गेले होते. कान्होजींनी शेवटची मोहीम १७२३ केली होती असे सांगितले जाते. त्यांनी तेव्हा ईगल आणि हंटर या दोन ब्रिटिश जहाजांवर हल्ला होता. पुढे कालांतराने ४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यांची समाधी अलिबाग येथे उभारण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com