कानिफनाथ यात्रेत आज गाढवांचा बाजार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पाथर्डी - कानिफनाथांच्या यात्रेसाठी जिल्हाभरातून मानाच्या काठ्या मढीमध्ये दाखल झाल्या आहेत. या यात्रेतील गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे. त्यासाठी राजस्थान, मध्य प्रदेश व राज्याच्या कानाकोपऱ्यांतून गाढवे विक्रीसाठी आणण्यात आली आहेत. 

कानिफनाथांनी रंगपंचमीला संजीवन समाधी घेतली. हजारो नाथभक्त समाधिदिनी मढीत येऊन समाधीचे दर्शन घेतात. समाधी दिन सोहळा शुक्रवारी (ता. 17) आहे. त्यामुळे भटक्‍यांची पंढरी असलेल्या मढीमध्ये सध्या यात्रेकरूंची गर्दी दिसत आहे. भटक्‍या समाजासह विविध जातिधर्मांतील भाविक आणि कलावंत यात्रेसाठी येतात. कानिफनाथांचे भक्त मानाच्या काठ्या (अस्तन्या) घेऊन येथे येतात. 

देवस्थान समितीने भाविकांसाठी वाहनतळ, पिण्याचे पाणी, निवासव्यवस्था, प्रसाद अशा विविध सोयी केल्या आहेत. दर्शनबारीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थानाचे अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी दिली. 

Web Title: kaniphnath yatra