कन्या जन्माने राज्य वनसमृद्ध

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 जानेवारी 2019

मुंबई - शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या जन्माचे स्वागत म्हणून तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड करण्याची योजना वन विभागाने ‘कन्या वन समृद्धी’ योजना या नावाने राबवण्यास सुरवात केली आहे. राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात दोन हजार १७७ मुलींच्या जन्मानंतर २१ हजार ७७० रोपांची लागवड केली आहे. 

पुणे विभागाने यात आघाडी घेतली असून, गेल्या वर्षी पावसाळ्यात ९७१ मुलींच्या जन्मानंतर तिथे सर्वाधिक नऊ हजार ७१० रोपांचे वाटप करण्यात आले. त्या पाठोपाठ नागपूर येथे ६७४ मुलींच्या जन्मानंतर सहा हजार ७४० रोपांचे वितरण करण्यात आले. अमरावतीमध्ये ४३८ मुलींच्या जन्मानंतर योजनेतून चार हजार ३८० झाडे लावण्यात आली. औरंगाबाद, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांनी योजनेतून शेतकऱ्याच्या घरी जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे झाडांचे वितरण केले आहे.

Web Title: Kanya Vansamruddhi Yojana Tree Plantation