मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील विजयी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी मतदान झालेल्या 8000 पेक्षा जास्त मतांपैकी 4 हजार पेक्षा जास्त मते कपिल पाटील यांना मिळाली आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. 

मुंबई : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी मतदान झालेल्या 8000 पेक्षा जास्त मतांपैकी 4 हजार पेक्षा जास्त मते कपिल पाटील यांना मिळाली आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. 

कपिल पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे. 
तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी विजयी आघाडी घेतली आहे. यामुळे शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबई पदवीधरचा गड कायम राखल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

कोकण पदवीधरच्या मतमोजणीला सुरवात झाली असून, शिवसेनेचे संजय मोरे यांनी 2000 पेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे. तर भाजपचे निरंजन डावखरे दुसऱ्या स्थानावर आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नजीब मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र, या तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचे अंतर खूप कमी असल्याने 'काँटे की टक्कर' होणार असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Kapil Patil won from Mumbai Teachers Constituency