karnataka assembly election 2023 : "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना", शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm eknath shinde on uddhav thackeray

karnataka assembly election 2023 : "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना", शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

कराड : : स्वत:चे घर जळत आहे त्याकडे लक्ष द्या, ते वाचवा. दुस-याचे घर जळत असताना कसला आनंद व्यक्त करीत आहात असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीत 'बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना', असा टाेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेतला लगावला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सगळे दिवाने झालेत असेही शिंदेंनी म्हटलं.

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ आज (शनिवार ता.१३) सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे झाला.

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाेलत हाेते. व्यासपीठावर मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत, मंत्री संदीपान भुमरे, साता-याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शहाजीबापू पाटील , आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित हाेते