कर्नाटकातील निवडणुकीसाठी मुंबईचे शिलेदार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

गोरेगाव - कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीच्या नुकत्याच संपलेल्या प्रचारात भाजपतर्फे मुंबईतून खासदार गोपाळ शेट्टी, आमदार तमिळ सेल्वन, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार आदी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची फौज उतरविण्यात आली होती. काँग्रेसनेदेखील संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आजी-माजी नगरसेवकांचा ताफा कर्नाटकात प्रचारासाठी पाठवला होता.

भाजपने कर्नाटकची लढत प्रतिष्ठेची केली असून, काँग्रेसलाही सत्ता टिकवायची असल्याने दोन्ही पक्षांत कमालीची चुरस होती. काँग्रेसने मुंबईतील संजय निरुपमसारखे मोठे मोहरे तिथे उतरवले होते. मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठे पथक कर्नाटकमध्ये पाठविले होते. मुंबई पालिका भाजप गटनेते मनोज कोटक, दक्षिण भारतीय नेते आमदार कप्तान तमिल सेल्वम, नगरसेविका कृष्ण वेली रेड्डी, राजश्री शिरवाडकर व शैलेंद्र सुवर्णा यांच्यासह खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वाखालीही एक मोठे पथक कर्नाटकात गेले आहे. सुधीर शेट्टी, मनी बालन, प्राचार्य राम अनुज, तीर्थराज स्वामी, जयानंद शेट्टी आदी नेतेही पथकात होते. 

गोरेगाव ते कांदिवली पट्ट्यातून समीर देसाई, मंत्री विद्या ठाकूर यांचे पती व भाजपा नेते जयप्रकाश ठाकूर, ज्ञानमूर्ती शर्मा, आर. यू. सिंह, ए. व्ही. कुलकर्णी आदी नेते प्रचारास गेले होते. काँग्रेसनेही माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक जगदीश अमीन कुट्टी, माजी नगरसेवक शिवा शेट्टी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठी फळी पाठवली होती.

विविध कामांची जबाबदारी
विधानसभेच्या जागांचा अभ्यास करून बुथ कार्यकर्त्यांना मदत करणे, मतदारांना मतदान केंद्रावर आणणे, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधणे, मुंबईतील नेत्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे पालन करणे आदी कामांची जबाबदारी मुंबईतील शिलेदारांवर सोपवण्यात आली आहे.

Web Title: karnataka vidhansabha election mumbai BJP Congress Politics