Kasba by poll election : कसबा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यांकडून गोपनीयतेचा भंग

कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
 Kasba by poll election
Kasba by poll election

कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यांकडून गोपनीयतेचा भंग झाल्याची माहिती समोर आली आहे. ( Kasba by poll election Breach of privacy by ncp Rupali Thombre Patil Ravindra dhangekar hemant rasane )

कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदाना दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढला. इतकेच नव्हे तर त्यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. गोपनीयतेचा भंग केल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मतदान हे गुपित असतं. मात्र, ठोंबरे पाटील यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेअर केलल्या फोटोमध्ये काँग्रेस उमेदवार धंगेकरांना मतदान केल्याचे दिसून येत आहे.

कसबापेठमध्ये भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी आमनेसामने आहेत.

कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com