हिमस्खलनात महाराष्ट्रातील तीन जवान हुतात्मा

Kashmir avalanches: Maharashtra's 3 soldier killed
Kashmir avalanches: Maharashtra's 3 soldier killed

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात 15 जवान हुतात्मा झाले असून, महाराष्ट्रातील तीन जवानांचा यामध्ये समावेश आहे. अकोल्याचे आनंद गवई, संजय खंडारे व बीडचे विकास समुद्रे हे जवान हिमस्खलनात हुतात्मा झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. 25 जानेवारी संध्याकाळी दोन मोठे हिमस्खलन झाले होते. पहिल्यांदा सैन्याचा एक कॅम्प हिमस्खलनात अडकला. त्यानंतर गस्तीवर असलेले काही जवान हिमस्खलनात अडकले. यामध्ये 15 जवानांचा मृत्यू झाला आहे. हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून या जवानांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱयांनी दिली.

बंदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळच हिमस्खलनाच्या या दोन विचित्र घटना घडल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीरला गुरेजची सीमा लागून असल्याने इथे जवानांचा कडेकोट बंदोबस्त असतो. बर्फाची कडा कोसळल्यानं अनेक जवान बर्फाखाली दबले गेले आहेत. भारतीय लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'खराब हवामानामुळे जवानांचे मृतदेह अद्यापही तिथेच आहेत. हवामान स्वच्छ झाल्यानंतर जवानांचे मृतदेह हेलिकॉप्टरच्या मदतीने श्रीनगरला पोहोचवले जातील.'

दरम्यान, लष्कराने शोधमोहीम राबवत एका अधिकाऱयासह सात जवानांना वाचवण्यात यश मिळवले आहे. काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव होत असल्याने हिमस्खलनाच्या घटना वारंवार घडत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com