
KCR : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातून क्रांती सुरू करणार; के. चंद्रशेखर राव यांचं विधान
नांदेड : निवडणुकीत कोण पक्ष जिंकला हे महत्वाचे नाही तर निवडणुकीत जनतेचा विजय झाला पाहिजे. तेलंगणातील जनतेच्या अपेक्षा विचारात घेऊनच भारत राष्ट्र समितीचे कार्य सुरू झाले आहे. महाराष्ट्रातून सुरूवात केली असून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातून क्रांती सुरू झाली आहे, असे प्रतिपादन बीआरएसचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी केले.
महाराष्ट्राला नेतृत्व करण्यासाठी संधी मिळाली आहे. कर्नाटकमध्ये भाजप हरली आणि काँग्रेस जिंकली. जनता जिंकली पाहिजे. देशात तेलंगणा मॉडेल जाणार आहे. पाण्याचे नियोजन नाही त्यामुळे पाणी समुद्रात वाहून जात आहे. एकही पक्ष स्थिती बदलणार नाही. शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच राहणार आहे.
शेतकरी पदयात्रा काढत आहेत. तेलंगणामधील शेतकऱ्यांवर ही वेळ आली नाही. तेलंगणा मॉडेल देशात गेले आहे. राजकीय पक्षाची इच्छा शक्ती नाही. महाराष्ट्रातील ४५ हजार गावात जाणआर. महाराष्ट्रातून सत्ता परिवर्तन होईल. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातून क्रांती सुरू करू. २२ मे ते ता. २२ जून पर्यंत प्रत्येक गावात जाणार. ज्यांना काम करायचे नाही त्यांनी काम सोडून द्यावे.
प्रत्येक गावात नऊ समित्या बनवा. प्रत्येक मतदारसंघात टॅब दिला जाईल. प्रत्येक गावात पाच हजार रुमाल, झेंडे, तीन हजार टोप्या देण्यात येणार आहे. शिवाय पदाधिकारी नियुक्त केले जातील. त्यांना चांगले प्रशिक्षण देण्यात येईल. नागपूर, औरंगाबाद येथे घर खरेदी करणार असून मुंबईत ऑफिस, कार्यकर्त्यांना निवास, भोजन व्यवस्था उपलब्ध करून देणार असल्याचंही केसीआर यांनी सांगितलं.