केरोसिन हवे की थेट खात्यात पैसे?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई - रेशनिंग दुकानासमोर केरोसिन, अन्नधान्यासाठी लांबच लांब रांगा लावायच्या, की सवलतीच्या दरानुसार रोखीने पैसे थेट बॅंक खात्यात मिळवायचे, हा पर्याय आता लाभार्थ्यांसमोर राहणार आहे. मुंबईतील परळमधील काही भागांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग पुढच्या महिन्यापासून सुरू केला जाणार आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून राज्यभरात हा प्रयोग केरोसिनसोबतच अन्नधान्याच्या वितरणासाठीही राबविला जाणार आहे. 

शिधावाटप केंद्रामार्फत लाभार्थ्यांना अन्नधान्य आणि केरोसिन वितरणात येणाऱ्या अडचणी आणि तक्रारींनी हैराण झालेले राज्य सरकार अन्नधान्य, केरोसिन वितरणातही रोखीने थेट पैसे देण्याचा (डीबीटी) मार्ग वापरण्याबाबत गंभीरपणे विचार करत आहे. प्रायोगिक तत्त्वावर मुंबईतील परळमधील काही भागात केरोसिनचे वितरण रेशनिंग दुकानाबरोबरच आधार कार्डद्वारे केले जाणार आहे. ज्यांना केरोसिनचे पैसे हवेत, त्यांनी बॅंकेच्या खात्यात नोंद असलेल्या आधार कार्डची माहिती शिधावाटप दुकानात नोंद करावयाची असल्याची माहिती राज्य सरकारने काढलेल्या आदेशात देण्यात आली आहे. राज्यात ५३ हजार शिधावाटप केंद्र आहेत. या शिधावाटप केंद्रचालकांचा या योजनेला विरोध होण्याची शक्‍यता असल्याने राज्य सरकार याबाबत सावध पावले उचलत आहे.

केरोसिनमध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे दिसून येत आहे. केरोसिनचा काळा बाजार करून ते डिझेलसारखे वापरले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांना तर ते मिळत नाही, शिवाय केरोसिन वाहनांमध्ये वापरल्याने प्रदूषणात वाढही होते. त्यामुळे सुरवातीला केरोसिनसाठी ‘डीबीटी’ प्रायोगिक तत्त्वावर वापरण्याचा विचार आहे. त्याला प्रतिसाद कसा मिळतो, त्यावर याच पद्धतीने अन्नधान्य वाटपासाठीही याच पद्धतीचा वापर करता येईल का, याचा भविष्यात विचार केला जाईल.
- गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

Web Title: Kerosene or money directly to the account

टॅग्स