राजकारण खोटेपणावर अवलंबून असणाऱ्या पवारांकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

राजकारण खोटेपणावर अवलंबून असणाऱ्या पवारांकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांसोबत बैठक सुरु घेतली आणि शिवसेनेला हिंदुत्वावरून डिवचणाऱ्या भाजपा आणि मनसेचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपा, मनसेवर तुटून पडा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कार्यकर्त्यांना दिले, त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरलं आहे. दरम्यान, आता भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून आहे. अशा शरद पवारांकडून दुसरी अपेक्षा करणार तरी कशी?, असंही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा: रोहिणी खडसे यांची अमृता फडणवीसांवर नाव न घेता टीका, म्हणाल्या..

मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. यामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या सगळ्यात आता भाजपच्या केशव उपाध्ये यांनी थेट शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे. शरद पावरांचा खोटेपणा उघड झाला असे त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणतात, कोरेगाव भीमा दंगलीच्या निमित्तानं शरद पवार यांनी भाजपाला बदनाम केलं. खोटं बोलत त्यांनी तत्कालीन राज्य सरकारनं पोलिसांच्या मदतीने घडवलेले षडयंत्र असल्याचा आरोप भाजपावर केला होता.

हेही वाचा: हिंदुत्वावर बोलण्याची विरोधकांची लायकी नाही, मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

पुढे ते म्हणाले, याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही त्यांनी पत्र लिहिलं होतं. पोलिसांनी मूळ पुरावे नष्ट करून अनेक खोटे पुरावे तयार केल्याचा दावाही केला. परंतु आता या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगासमोर पवारांनी आपल्याकडे काहीही माहिती उपलब्ध नाही. कुठल्याही राजकीय पक्षावर आरोप करायचा नाही असं प्रतिज्ञापत्र सादर केलंय. त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्याने केवळ राजकारणासाठी खोटेपणाचा वापर करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावं आणि पत्रकार परिषद घेत सातत्याने भाजपाला बदनाम करावं हे दुर्दैवी म्हणावे लागेल. मात्र ज्यांचं संपूर्ण राजकारणच खोटेपणावर अवलंबून आहे. अशा शरद पवारांकडून दुसरी अपेक्षा करणार तरी कशी?, असा सवाल करत त्यांनी पवारांना टोला लगावला आहे.

हेही वाचा: Jalna News | शिवरायांचा पुतळा रात्रीतून हटविला, वीस जणांवर गुन्हा दाखल

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बैठकीत अनेक विषयांवर भाष्यत केलं आहे. बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. या खरमरीत टीकेमुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कधी नव्हे ती थेट राज ठाकरेंवर टीका केली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेनेला हिंदुत्वावरून डिवचणाऱ्या भाजपा आणि मनसेचे हिंदुत्व किती बोगस आहे हे जनतेला दाखवून द्या, भाजपा, मनसेवर तुटून पडा, असे आदेशच ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना दिले आहेत.

Web Title: Keshav Upadhye Criticized On Sharad Pawar On Politics Bhima Koregaon Incidence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top