
'भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना दिलेत'
'तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात अन् नखं काढलेल्या वाघासारखी झालीये'
शिवसेना (Shivsena) प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजपवर (BJP) तुटून पडा, त्यांचे हिंदुत्व बोगस असल्याचे दाखवा, असा आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून टीका सुरु झाली आहे. भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना दिलेत. त्यांनी भाजपाचं हिंदुत्व खोटं ठरवण्यासही सांगितलं आहे. तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झाली असून तो केवळ डरकाळ्या फोडू शकतो, असा घणाघात भाजपाचे केशव उपाध्याय यांनी केला आहे.
हेही वाचा: शिवसेनेला नडणाऱ्यांना जशास तसं उत्तर द्या : उद्धव ठाकरे
यांसदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणार एक ट्विट उपाध्याय यांनी केले आहे. यात त्यांनी कॉंग्रसेचे गांधी घराणं आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणतात, भाजपावर तुटून पडा, असे आदेश वर्क फ्रॉम होम करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवक्त्यांना दिले आहेत. भाजपाचं हिंदुत्व खोटं ठरवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. ज्यांनी हिंदुत्वाला अनुकूल अशी कुठलीही भूमिका घेतली नाही अशा पवार-गांधींकडे तुम्ही हिंदुत्व मुख्यमंत्रीपदासाठी ठेवलं आहे. तुमच्या सरकारच्या कुबड्या पवार आणि सोनिया गांधी यांनी झटकन काढून घेतल्या आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना सोईस्कर अशाच भूमिका घेत आहात. ज्यामध्ये हिंदू हित शुन्य आहे. थोडक्यात तुमच्या हिंदुत्वाची अवस्था दात आणि नखे काढलेल्या वाघासारखी झाली आहे. जो केवळ डरकाळ्या फोडू शकतो, त्याकडून बाकी काही होणे शक्य नाही. तुमच्या नाकर्त्या कारभारामुळे तुमचे कार्यकर्ते तुमच्यापासून ‘तुटले’ आहेतच. फक्त ‘पडा’यचे बाकी आहे, ते निवडणुकीत होऊन जाईल!, अशी खरमरीत टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
हेही वाचा: रोहिणी खडसे यांची अमृता फडणवीसांवर नाव न घेता टीका, म्हणाल्या..
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा होणार आहे. मनसेने पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आहे. या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला सडेतोड उत्तरं देण्याचा आदेश दिला आहे. बैठकीत बाबरी मशिद, तसेच अन्य मुद्द्यांवर चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. 'बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते. मंदिरासाठी यात्रा सुरु होती तेव्हा राज ठाकरेंचे काय सुरु होतं. भाजपवर (BJP) तुटुन पडा सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या. यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा, असंही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असल्याची चर्चा आहे.
Web Title: Keshav Upadhye Criticized To Cm Uddhav Thackeray On Yesterday Meeting Of Shiv Sena On Bjp
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..